मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या मैदानापासून बाहेर सध्या कुटूंबाला वेळ देतोय. त्याच्या क्रिकेट फॉर्मबद्दल बोलायचं झालं तर सध्य़ा तो आऊट ऑफ फॉर्म आहे. या फॉर्मवरून अनेक दिग्गज खेळाडू त्याच्यावर टीका करताना व सल्ले देताना दिसतायत. दरम्यान आता पाकिस्तानच्या या खेळाडूने विराटला दिलेला सल्ला चाहत्यांच्या पचनी पडताना दिसत नाहीए.(Former Pakistan cricketer Shahid Afridi criticize Virat Kohli on her cricket form) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला आफ्रिदी? 


'क्रिकेटमध्ये अँटीट्यूड सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. क्रिकेटबद्दलचा अँटीट्यूड काय आहे की नाही? कोहलीला कारकिर्दीच्या सुरुवातीला जगातील नंबर 1 फलंदाज बनायचे होते.तो अजूनही त्याच प्रेरणेने क्रिकेट खेळतो का, हा मोठा प्रश्न आहे, असे आफ्रिदीने म्हटले. 


तो पुढे म्हणतो, विराटकडे खेळण्याचा एक क्लास आहे. पण त्याला खरोखरच पुन्हा नंबर 1 व्हायचे आहे का? की कोहलीला आता वाटायला लागले आहे की आता त्याने आयुष्यात सर्व काही मिळवले. आता फक्त आराम करून टाईमपास करायचा? असे आफ्रिदी याने सांगितले. एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने या गोष्टी सांगितल्या.  


IPL कामगिरी 
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली यंदा खराब फॉर्मशी झुंजताना दिसत आहे. आयपीएलच्या नुकत्याच झालेल्या सीझनमध्येही कोहली काही खास कामगिरी करू शकला नाही. IPL 2022 मध्ये, विराट कोहलीने 16 सामन्यांमध्ये 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या, ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर तीन वेळा विराट गोल्डन डकचा (पहिल्या चेंडूवर बाद) बळी ठरला.


कोहली आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताकडून खेळताना दिसणार आहे. मात्र विश्रांतीनंतर तो चांगले पुनरागमन करतो का?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.