रशिया : फिफा फुटबॉल विश्व चषकमध्ये निझनी नोव्हगोरोड स्टेडियमवर रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सने उरुग्वेवर २-० असा एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे फ्रान्सने उपांत्य फेरीत धडक मारली. फ्रान्सने विजय नोंदवत आपली विजयी घोडदौड कायम राखली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सकडून ४०व्या मिनिटाला राफाएल वाराणे आणि ६१व्या मिनिटाला अँटोइन ग्रीझमनने गोल डागले. उरुग्वेला संपूर्ण सामन्यात एकही गोल करता आला नाही.  फिफा जागतिक क्रमवारीत फ्रान्स सातव्या तर उरुग्वे चौदाव्या क्रमांकावर आहे.


या वर्षी फॉर्ममध्ये असलेला उरुग्वेचा संघ फ्रान्सला तगडे आव्हान देईल, असे वाटले होते. मात्र, कॅव्हानीच्या गैरहजेरीत खेळत असलेल्या उरुग्वेला फ्रान्सचे आक्रमण रोखता आले नाही. उरुग्वेवर २-० असा विजय मिळवून यंदाच्या फुटबॉल विश्व चषक उपांत्यफेरीचं तिकीट मिळवणारा फ्रान्स हा पहिला संघ ठरला आहे.