France Vs Argentina: FIFA वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup 2022) चा अंतिम सामना सुरु झालाय. अर्जेंटीना आणि फ्रान्स (France Vs Argentina) यांच्यामध्ये हा सामना खेळवला जातोय. लिओनेल मेस्सीचे (Lionel Messi) चाहते अर्जेंटीनाने सामना जिंकावा अशी इच्छा आहे. दरम्यान या मोठ्या सामन्यापूर्वी चॅम्पियन कोण होणार याबाबतचा अंदाज जवळपास प्रत्येकाने बांधला. तर सामन्यापूर्वी एका व्यक्तीने मेस्सी आज रडणार असल्याचं भाकित केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी पत्रकार पियर्स मॉर्गनने फायनलच्या सामन्याबाबत एक भाकीत केलं केलंय. त्याने केलेया या भाकिताची सोशल मीडियावर हेडलाइन्स बनतायत. पियर्स मॉर्गन यांच्या म्हणण्यानुसार, फायनलच्या सामन्यामध्ये फ्रान्स जिंकणार असून अर्जेंटिना हा सामना 1-3 ने हरणार आहे.


पियर्स मॉर्गनच्या लिहिण्यानुसार, या सामन्यामध्ये एम्बाप्पे दोन गोल मारणार तर, सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू हा ग्रिझमन ठरणार आहे. याशिवाय अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनेस मेस्सी आज रडणार आहे. मॉर्गनचे हे ट्विट फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापूर्वी चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. 


पियर्स मॉर्गनने वर्ल्डकपपूर्वी क्रिस्टियानो रोनाल्डोचा इंटरव्ह्यू घेतला होता. या इंटरव्ह्यूनंतर बराच गदारोळ झाला होता. या मुलाखतीनंतर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील संबंध बिघडले असल्याची चर्चा आहे.


कोण कोरणार वर्ल्डकपवर नाव?


अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन टीम्सने धडक मारली आहे. मुख्य म्हणजे, मेस्सीची टीम आणि एम्बाप्पेची टीम या दोन्ही तुल्यबळ असल्याने वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर गजविजेता फ्रान्स यंदाही विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे लक्ष लागलंय.


मेस्सीकडे इतिहास रचण्याची संधी


जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या लियोनेल मेस्सीकडे आपल्या टीमला चॅम्पियन बनवण्याची मोठी संधी आहे. मुख्य म्हणजे, मेस्सीसाठी ही लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्यामुळे अर्जेंटीनासाठी त्याचा हा शेवटचा सामना असू शकतो.


अर्जेंटींनाच्या टीमने आतापर्यंत सहावेळा वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. तर दोन वेळा या टीमने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. 1978 आणि 1986 या दोन वर्षी अर्जेंटीनाच्या टीमने वर्ल्डकप जिंकला होता. फान्सच्या टीमची गोष्ट असेल तर या टीमने देखील आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. ज्यामध्ये 1998 आणि 2018 या वर्षांचा सामवेश आहे. दोन्ही टीम त्यांच्या तिसऱ्या खिताबासाठी लढणार आहे.