पॅरिस : भारतीय टेनिसस्टार रोहन बोपन्नानं फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. बोपन्नानं आपली कॅनेडियन पार्टनर गॅब्रिएला दाब्रोवस्कीच्या साथीनं फायनलमध्ये 2-6, 6-2, 12-10 नं बाजी मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनलमधये इंडो-कॅनेडियन जोडीनं अॅना ग्रोएनफिल्ड आणि रॉबर्ट फराह जोडीचा पराभव करत फ्रेंच ओपनला गवसणी घातली. रोहन बोपन्नाचं आपल्या टेनिस करिअरमधील हे पहिलंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. ग्रँडस्लॅम जिंकणारा तो लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झानंतर चौथा टेनिसपटू ठरलाय.