फ्रेंच ओपन : मासिक पाळीवर आजही आपल्याकडे उघडपणे तेवढं बोललं जात नाही. मासिक पाळीवर आजही कुजबुज किंवा कानात गोष्टी सांगितल्या जातात. स्त्रियांच्या समस्या, मासिक पाळीतल्या वेदना यावर फार उघडपणे भाष्य करणाऱ्यांना काहीवेळा ट्रोलही केलं जातं. पण चक्क एक महिला खेळाडू यावर बोलली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिला खेळाडूनं मासिक पाळीत होणाऱ्या वेदनेमुळे सामना गमवावा लागला. केवळ मासिक पाळीच्या त्रासामुळे तिला विजेतेपद पटकवता आलं नाही म्हणून खंत व्यक्त केली.


 पहिला सेट खेळल्यानंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिला पुढच्या सेटमध्ये खेळणं कठीण झालं. याचमुळे सामना गमावण्याची वेळ आली. महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कोणीच विचार करत नाही. सरसकट त्यांना ट्रोल केलं जातं. मात्र ती याचा बाऊ न करता जिद्दीने खेळली. मात्र दुसऱ्य़ा सेटला तिला असह्य वेदना झाल्या आणि त्यासोबत सामनाही गेला.


पहिला सेट संपल्यानंतर तिला खूप जास्त त्रास होऊ लागला. पहिला दिवस नेहमीच खूप कठीण असतो आणि त्यामुळे मला सामना खेळावा लागला. पहिल्या दिवशी मला नेहमीच खूप वेदना होतात. मी सहन करू शकत नव्हते. निसर्गाच्या विरोधात जाऊ नका. मला वाटते की मी मुलगा असते तर मला या सगळ्यातून जावे लागले नसते. हे खूपच अवघड आहे. 


सामन्याचा पहिला सेट 82 मिनिटे चालला. त्यानंतर तिने टायब्रेकमध्ये पुनरागमन करत 2/5 अशा फरकाने पिछाडीवर पडून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूचा पराभव केला. 


दुसऱ्या सेटमध्ये 0-3 ने गेल्यानंतर झेंगच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर तिला सामन्यात पुनरागमन करता आले नाही आणि दुसऱ्या सेटनंतर तिसरा सेट गमावला. या महिला खेळाडूचं नाव झेंग असं आहे.  फ्रेन्च ओपनमध्ये सामना खेळताना तिला झालेल्या त्रासावर ती सांगत होती.