फ्रेंच ओपन : लॅटवियाच्या येलेना ओस्टापेन्कोला अजिंक्यपद
लॅटवियाच्या येलेना ओस्टापेन्कोनं फ्रेंच ओपनचं अजिंक्यपद पटकावलंय. तिच्या टेनिस करिअरमधील हे पहिलंच ग्रँडस्लॅम ठरलंय.
पॅरिस : लॅटवियाच्या येलेना ओस्टापेन्कोनं फ्रेंच ओपनचं अजिंक्यपद पटकावलंय. तिच्या टेनिस करिअरमधील हे पहिलंच ग्रँडस्लॅम ठरलंय. त्याचप्रमाणे ग्रँडस्लॅम जिंकणारी ती लॅटवियाची पहिली टेनिसपटू ठरली.
फायनलमध्ये तिनं रोमेनियाच्या सिमोना हालेपवर मात केली. 4-6, 6-4, 6-3 नं तिनं फायनलमध्ये विजय साकारला. 34 वर्षांनी एखाद्या बिगरमानांकित टेनिसपटूनं फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.
ओस्टापेन्कोनं फायनलमध्ये प्रवेश केलाच आणि आपलं पहिलं-वहिलं ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमयाही साधली. पहिला सेट गमावल्यानंतर तिनं जोरदार कमबॅक करत तिस-या मानांकित सिमोना हालेपचा पराभव केला.