वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मितालीला बनायचे होते डान्सर
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करताना नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करताना नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
वनडेत सर्वाधिक ६०१५ धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटर बनलीये. मिताली यशस्वी क्रिकेटरपैकी एक आहे. मात्र भारताची कर्णधार असलेल्या मितालीला एकेकाळी क्रिकेटमध्ये अजिबात रस नव्हता तिला डान्सर बनायचे होते.
मिताली भरतनाट्यम शिकलीये. जेव्हा मिताली १० वर्षांची होती तेव्हा ती क्रिकेटर बनणार असल्याची भविष्यवाणी झाली होती ती खरी ठरली.
तिचे कोच संपत कुमार यांनी मिताली १० वर्षांची असतानाच तिच्यातील प्रतिभा हेरली होती. त्यानंतर तिला ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. मित्रांमध्ये मितूच्या नावाने परिचित असलेली मितालीला डान्सर व्हायचे होते. मात्र तिच्या नशीबात क्रिकेटच होते.