`सुधर जाओ वरना सुधार देंगे`, दहशतवादी हल्ल्यावर सेहवागकडून संताप व्यक्त
पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर भारतीय क्रिकेटर्सने व्यक्त केला राग
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला एका कारच्या मदतीने करण्यात आला. ज्यामध्ये जवळपास ७० किलो दारुगोळा भरला होता. ही कार सीआरपीएफच्या बसला जाऊन धडकली ज्यामध्ये भारतीय जवान होते. सीआरपीएफच्या या ताफ्यात जवळपास २५०० जवान होते. पण अचानक झालेल्य़ा हा हल्ल्यात ४४ जवानांना वीरमरण आलं. या घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राग आहे. सोशल मीडियावर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना याचं चोख प्रत्त्यूतर देण्याची मागणी होत आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटर्सने देखील या हल्ल्याची निंदा करत शोक व्यक्त केला आहे.
टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने पाकिस्तानसोबत दहशतवाद्यांना देखील धडा शिकवण्याची मागणी केली आहे. गंभीरने ट्विट करत म्हटलं की, हा या कट्टरतावाद्यांशी आणि पाकिस्तानसोबत चर्चा करुया. पण ही चर्चा टेबलवर नाही तर युद्धाच्या मैदानावर करुया. प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. जम्मू काश्मीर हायवेवरील आयइडी स्फोटात भारतीय जवान शहीद झाले.'
वीरेंद्र सेहवागने देखील या हल्ल्यावर शोक व्यक्त करत म्हटलं की, 'सुधरा नाही तर सुधारुन टाकू. जम्मू-काश्मीरमधील भ्याड हल्ल्यात सीआरपीएफ जवानांच्या वीरमरणावर खूप दु:ख होत आहे. हे दु:ख जाहीर करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.'
शिखर धवनने म्हटलं की, मी ही बातमी ऐकूण खूपच दु:खी आणि विचलित झालो आहे. मी पुलवामामध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची निंदा करतो. ज्या जवानांनी देशासाठी प्राण दिले. त्या जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.'
सुरेश रैनाने म्हटलं की, 'काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या शहीद होण्याची बातमी ऐकूण दु:खी आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या प्रति मी माझी संवेदना व्यक्त करतो.'