गार्डन में घुमने आया क्या? शर्माने वर्माला झापलं, पण तिलक उत्तर ऐकून रोहितही खदकन हसला; पाहा Video
Rohit Sharma Viral Garden Video : केकेआरविरुद्ध सामन्यापूर्वी रोहित शर्माने तिलक वर्माला (Tilak Varma) मैदानात चप्पल घातल्याने झापलं. त्यावर तिलकने भन्नाट उत्तर दिलं.
Tilak Varma unique Reply to Rohit Sharma : आयपीएलमध्ये (IPL 2024) अखेरच्या रंगतदार लढली होत आहे. प्लेऑफसाठी 4 संघात तगडी फाईट पहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या हंगामातून बाहेर झालेली पहिली टीम बनलीये. त्याचबरोबर आता पंजाब देखील प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेली आहे. अशातच आता मुंबईचे खेळाडू प्लेऑफमधून बाहेर पडले असले तरी आगामी सामन्याच्या तयारीत आहेत. मुंबई इंडियन्सचा आगामी सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र, त्याआधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांचा एक व्हिडीओ तुफान शेअर केला जात आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिलक वर्मा ईडन गार्डन्स मैदानावर फोनमध्ये डोकं घालून काहीतरी करताना दिसतोय. त्यावेळी तिलकने पायात सॉक्स आमि चप्पल घातली होती. त्याचवेळी मैदानात रोहित शर्मा आला. तिलकच्या पायात चप्पल पाहून रोहितला राग आला. हिटमॅनने तिथंच तिलकला झापलं. चप्पल पेहेनके गार्डन में घुमने आया क्या? असा सवाल (Garden mai ghumane aaya kya) रोहितने रागात तिलकला केला. त्यावेळी तिलकने संयमाने उत्तर दिलं.
रोहितचा प्रश्न ऐकून तिलक थोडा थांबला अन् उत्तर दिलं. गार्डनमध्येच आलोय रोहित भैय्या... ईडन गार्डन...असं म्हणत तिलकने उत्तर दिलं. तिलकच्या उत्तराने रोहितला देखील धुंदीर झाला अन् खदकन हसला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इडन गार्डनवर झालेल्या पावसामुळे सध्या मैदान ओलं दिसतंय. त्यामुळे आता सामन्यावर पाणी फेरणार नाही ना? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
पाहा Video
रोहित अन् गार्डन अनोखी प्रेम कहाणी
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने युवा खेळाडूंना हाताशी धरून मालिका जिंकली होती. यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, रजत पाटीदार यांसारखे खेळाडू टीम इंडियासाठी डेब्यू करत होते. त्यावेळी फिल्डिंग करताना रोहित शर्माचा व्हाईस माईक कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला होता. त्यानंतर रोहित आणि गार्डन यांची अनोखी प्रेम कहाणी क्रिकेटच्या इतिहासात लिहिली गेली.