मुंबई : लखनऊ विरुद्ध कोलकाता रंजक सामना झाला. या सामन्यात 2 धावांनी कोलकाताचा पराभव लखनऊ टीमने करत प्लेऑफचं स्थान निश्चित केलं. कोलकाताला मोठा फटका बसला. तर लखनऊचे कोच गौतम गंभीरचे अनोखं सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरने केलेलं सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. लखनऊचा विजय झाला आणि प्लेऑफपर्यंत पोहोचलो याचा आनंद काही वेगळाच होता. हा आनंद गौतम गंभीर कंट्रोल करू शकला नाही. सेलिब्रेशनमध्येही आक्रमकपणा होता. 


गौतम गंभीरने लखनऊ विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर जोरात टाळ्या वाजत होता. त्याने खेळाडूंना आनंदाने मिठी मारली आणि अनोखं सेलिब्रेशन साजरं केलं. प्लेऑफपर्यंत पोहोतल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. 


गौरम गंभीरने बॉलिंग कोच एंडी बिचेल यांनाही मिठी मारली. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चा टीम IPL 2022 मध्ये पदार्पण करताना त्यांच्या पहिल्याच हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरला होता.लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने 2022 च्या मध्य IPL मध्ये पदार्पण केले असते.