नवी दिल्ली : अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एएसआय अब्दुल राशिद शहीद झाले. अब्दुल राशिद यांच्या अंत्ययात्रेवेळी त्यांची मुलगी जोहराला अश्रू अनावर होत होते. जोहराचा हा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोहराचा हा फोटो पाहून क्रिकेटपटू गौतम गंभीरही भावूक झाला आणि त्यानं जोहराची मदत करायचं ठरवलं आहे. जोहराच्या शिक्षणाचा खर्च आपण करणार असल्याचं ट्विट गंभीरनं केलं आहे. जोहरा मी तुला लोरी ऐकवू शकत नाही पण तुझी स्वप्न साकार करायला मदत नक्कीच करू शकतो. तुझ्या शिक्षणासाठी मी मदत करीन, असं ट्विट गंभीरनं केलंय.


मला मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे. माझ्या वडिलांचीही तीच इच्छा होती, असं जोहरा म्हणाली आहे. दहशतवादी हल्ल्यादरम्यान अब्दुल राशिद यांना गोळी लागली होती. गोळी लागली असताना राशिद ड्यूडीवर होते आणि पोलीस स्टेशनला परतत होते.