Gautam Gambhir Press Conference : 22 नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणं महत्वाचं आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये  लाजिरवाण्या पराभवानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाची तयारी कशी आहे याबाबत सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli)  खराब फॉर्म विषयी भाष्य केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार रोहित शर्मा दोघे सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि विराट चांगली कामगिरी करू शकले नाहीत. काहीवेळा टीम इंडियाला आवश्यकता असताना दोघे दोन अंकी धावसंख्या सुद्धा करू शकले नव्हते त्यामुळे त्यांच्या खेळीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत रोहित आणि विराटची बाजू घेतली. 


काय म्हणाला गौतम गंभीर? 


मला विराट आणि रोहितची चिंता नाही. मला वाटते की ते दोघे खूप मजबूत खेळाडू असून त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. तसेच भविष्यातही ते बरेच काही साध्य करत राहतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कठोर परिश्रम करतात - ते अजूनही पॅशनेट आहेत. त्यांना अजून खूप काही साध्य करायचे आहेत जे खूप महत्वाचं वाटतं. मला वाटतं की मागे झालेल्या सिरीजनंतर दोघेही चांगली कामगिरी करण्यासाठी तत्पर आहेत. 


हेही वाचा : गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन, सोशल मीडियावर झाली व्हायरल


 


गंभीरने पॉटींगला झापलं : 


ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर गावसकर चषकातील 5 कसोटी सामने खेळण्यासाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीरने पॉटींगवर निशाणा साधला आहे. "पॉटींगला भारतीय क्रिकेटबद्दल काय देणंघेणं आहे? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दल विचार करावा. मुळात विराट आणि रोहितबद्दल त्याला चिंता वाटण्याचं काही कारण नाही. मला वाटतं की ते फार उच्च दर्जाचे खेळू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरंच काही केलं आहे. भविष्यातही ते दोघे भारतीय क्रिकेटमध्ये भरीव योगदान देतील," असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे.


बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : 


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर


बॉर्डर गावस्‍कर ट्रॉफीचं वेळापत्रक : 


पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी