Gautam Gambhir On His Relationship With Virat Kohli: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती बीसीसीआयकडून करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 9 जुलै रोजी गंभीरची पुढील पाच वर्षांसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जात असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे आता विराट कोहलीचं (Virat Kohli) काय होणार? विराट आणि गंभीरचं नातं जगजाहीर आहे. या दोघांमध्ये यापूर्वी मैदानात अनेकदा खटके उडाल्याचं इंडियन प्रिमिअर लिगच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच प्रशिक्षक झालेला गंभीर आता विराटबरोबर कसं वागणार? दोघांमधील वादाचा संघावर परिणाम होणार का? यासारख्या प्रश्नांची चाहत्यांमध्ये चर्चा असतानाच स्वत: गंभीरने पत्रकरांसमोर उघडपणे भाष्य केलं आहे.  


मी त्याच्याशी किती बोलतो हे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी आज बीसीसीआयने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रशिक्षक गंभीर आणि निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. यावेळेस गंभीरला विराटबरोबरच्या नात्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला गंभीरने अगदी सविस्तरपणे उत्तर दिलं. "विराटबरोबर माझं नातं काय आहे हा टीआरपीचा विषय नाही. सध्याच्या क्षणाला आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही 140 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करतोय. आमचं मैदानाबाहेरचं नातं उत्तम आहे. मात्र हे नातं सार्वजनिक नाही. मी त्याच्याबरोबर सामन्यादरम्यान किंवा सामन्यानंतर किती बोलतो हे महत्त्वाचं नाही. तो फार प्रोफेश्नल आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून तो त्याच पद्धतीने खेळत राहील अशी अपेक्षा आहे," असं गंभीर विराटबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. 


माझी नियुक्ती झाल्यानंतर मी विराटबरोबर...


तसेच पुढे बोलताना, "मैदानाबाहेर विराट कोहलीबरोबर माझं फार छान नातं आहे. ते मी आहे तसेच ठेवणार आहे. मात्र आमचं नातं कसं आहे हे सार्वजनिक करणं मला पटत नाही. मला वाटतं की ही दोन व्यक्तींमधील बाब आहे. माझी प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर मी विराट कोहलीबरोबर मेसेजवरुन बरीच चर्चा केली. माझे त्याच्याबरोबर फार छान संबंध आहेत," असंही गंभीर म्हणाला.


नक्की वाचा >> ...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली


विराटने आधीच नोंदवलेली प्रतिक्रिया


दरम्यान, विराटने यापूर्वीच गंभीरच्या नियुक्तीनंतर आपली प्रतिक्रिया दिल्याची बातमी समोर आली होती. विराट आणि गंभीर पहिल्यांदाच नव्या भूमिकेत एकत्र दिसणार असतानाच आधीच्या वादासंदर्भात विराटने स्पष्टपणे आपली भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर मांडल्याचं वृत्त 'क्रिकबझ'ने साधारण आठवडाभरापूर्वी दिलेलं.


नक्की वाचा >> रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..'


आमच्यातील वादाचा परिणाम खेळावर आणि संघावर होणार नाही असं विराटने बीसीसीआयला कळवलं. विराट कोहलीने गंभीरबरोबर भूतकाळात झालेल्या वादांचा परिणाम भारतीय संघामध्ये त्यांच्या असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्यावर होणार नाही असं बीसीसीआयला सांगितल्याचे समजते. भारतीय संघाला जास्तीत जास्त फायदा होईल अशी कामगिरी करण्याचा मानस या दोघांचा असल्याने बोर्डाने फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे समजते.