गौतम गंभीरने ऑल टाईम बेस्ट प्लेईंग11 मधून रोहित शर्माला केलं बाहेर, `या` खेळाडूंचा केला समावेश
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने भारताची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडली आहे
Gautam Gambhir Team India All Time Playing 11 : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने भारताची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडली आहे. या प्लेईंग 11 मध्ये त्याने रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला जागा दिली नसून स्वतःला वीरेंद्र सेहवाग सोबत ओपनिंग फलंदाज म्हणून निवडलं आहे. विराट कोहलीला गौतम गंभीरने भारतासाठी निवडलेल्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये 5 व्या नंबरचा फलंदाज म्हणून निवडले आहे. यासोबतच सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार राहुल द्रविड याला सुद्धा या प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलंय.
गौतम गंभीर त्याच्या स्पष्ट वक्तेपणातून केलेल्या स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत येत असतो. स्पोर्टसकिडाला दिलेल्या एका मुलाखतीत गौतम गंभीरने भारताची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडली आहे. गौतम गंभीरच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये विराट कोहलीला संधी मिळाली परंतु यात रोहित शर्माचा समावेश केला नाही. गंभीरने अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांचा टीममध्ये स्पिनर म्हणून समावेश केला आहे तर वेगवान गोलंदाज जहीर खान आणि ऑल राउंडर इरफान पठाण याला सुद्धा संधी दिली आहे.
गौतम गंभीरने ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडताना वीरेंद्र सेहवाग सोबत ओपनिंग फलंदाज म्हणून निवडले आहे. गंभीरने म्हंटले, "मी आणि सेहवाग ओपनर म्हणून टीममध्ये असू , राहुल द्रविड तिसऱ्या स्थानी आणि सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानावर तर विराट कोहली 5 नंबरवर असतील. युवराज सिंहला सहाव्या नंबरवर तर महेंद्र सिंह धोनीला त्यांनी सातव्या नंबरवर ठेवलं आहे. अनिल कुंबळे याला प्लेईंग 11 मध्ये आठव्या स्थानावर, आर अश्विनला 9 व्या स्थानावर तर इरफान पठाणला 10 व्या स्थानावर संधी दिलीये. तर जहीर खान याला सर्वात शेवटच्या 11 व्या स्थानी संधी दिली आहे.
गौतम गंभीरची ऑल टाइम टीम इंडिया प्लेईंग 11 :
गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग, राहुल द्रविड़, सचिन तेंदुलकर, विराट कोहली, युवराज सिंह, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), अनिल कुंबले, आर अश्विन, इरफान पठान, जहीर खान