Gambhir vs Sreesanth Controversy : टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा मागील काही दिवसांपासून भारतीय संघ आणि टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी त्यांच्या निवड प्रक्रियेबद्दलच्या वक्तव्यावरून भलताच चर्चेत आहे. नुकतंच लीजेंड्स लीग क्रिकेटमधील एलिमिनेटर सामन्यात एस श्रीसंत यांच्याशी झालेल्या वादामुळे गंभीर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे आता गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच श्रीसंतसोबतच्या वादावर गौतम गंभीर याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


Gambhir काय म्हणतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीसंतसोबत हा वाद का झाला? नेमकं कारण काय होतं? असा सवाल गंभीरला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने कोणतंही वक्तव्य करण्यास नकार दिला. मी या विषयावर कोणतंही वक्तव्य करणार नाही. यावर बोलण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. मी इथं चांगल्या कामासाठी आलोय. त्यामुळे मला यावर काहीही बोलायचं नाहीये, असं गंभीरने यावेळी म्हटलंय. 


काय म्हणाला श्रीसंत?


मैदानात गंभीर मला फिक्सर-फिक्सर असं म्हणत डिवचत राहिला. अंपायरसमोरही तो मला फिक्सर म्हणत गोलंदाजी करायला जा असं म्हणत होता. मी तिथून निघून गेलो तरी तो तोच शब्द वापरत राहिला. मी त्याच्याविरुद्ध एकही वाईट शब्द वापरला नाही. तो प्रत्येक खेळाडूशी असाच वागतो. गौतम गंभीरकडे भरपूर पैसा आहे आणि त्याचा पीआरही खूप मजबूत आहे, जगाचं लक्ष स्वत:कडे वळवण्यासाठी मैदानात तो अशी कृती करतो, असं श्रीसंत याने म्हटलं होतं.


आणखी वाचा - रोहित शर्माची कॅप्टन्सी राहणार की जाणार? जय शहा यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात 'टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला...'


दरम्यान, आयपीएल 2013 च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या अनुशासनात्मक समितिने श्रीसंतवर बंदी घातली होती. मात्र, 2019 मध्ये उच्च न्यायालयाने 2019 मध्ये त्याच्यावरची बंदी हटवली होती. आता लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दोन्ही वादात सापडलेले खेळाडू पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.