युवराजचे संघात पुनरागमन कठीण वाटते - गंभीर
भारताचा सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाहीये.
नवी दिल्ली : भारताचा सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाहीये.
युवराज सिंग, मोहम्मद शामी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. वनडे संघात युवराजला स्थान न दिल्याबाबत भारताचा क्रिकेटर गौतम गंभीरने आपलं मत व्यक्त केलंय. युवराजला विश्रांती देण्यात आलीये हे म्हणणंच चुकीचं आहे. त्याचे संघातील पुनरागमन अशक्य आहे. मला नाही वाटतं आराम हा शब्द युवराजसाठी चुकीचा आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बातचीत करताना गंभीर म्हणाला, मला नाही वाटतं युवराज भविष्यत संघात स्थान मिळवू शकेल. युवराजला आराम देणं योग्य नाही. कारण तो अनेक दिवसांपासून क्रिकेट खेळलेला नाहीये. जर तुम्ही त्याला वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहू इच्छिता तर त्याला अधिकाधिक संधी दिल्या पाहिजेत. एका मालिकेत आराम देऊन दुसऱ्या मालिकेत तुम्ही त्याला खेळवू शकत नाहीत. हे सगळं पाहता युवराजचे पुनरागमन कठीण वाटते.