मुंबई : हैदराबादच्या विरुद्ध ख्रिस गेलने तुफान खेळी करत शतक ठोकलं. 63 बॉलमध्ये त्याने 104 रन करत हैदराबादपुढे मोठं लक्ष्य ठेवलं. पंजाबच्या विजयाचा तो शिल्पकार ठरला. सामना संपल्यानंतर गेलने अनेक गोष्टी बोलून दाखवल्या. गेलने म्हटलं की, मी ज्या फ्रेंचायजीसाठी खेळतोय त्याच्यासाठी 100 टक्के देऊ इच्छितो. कारण अनेक लोकं म्हणतात की गेलला अजून खूप काही सिद्ध करायचं आहे.'


का केली ती अॅक्शन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल शतक ठोकल्यानंतर बॅट लहान मुलांप्रमाणे घेत अॅक्शन करतो. त्याची ही अॅक्शन सध्या चर्चेत आहे. गेलं असं का करतो याबाबत त्यानेच खुलासा केला आहे. गेल त्याचं शतक त्याच्या मुलीला समर्पित करतो. आज गेलच्या मुलीचा वाढदिवस आहे. दुसऱ्यांदा असं झालं आहे की, मुलीच्या वाढदिवशी गेल भारतात आहे.



सीजनमधलं पहिलं शतक


गेलने हैदराबाद विरुद्ध 11 व्या सीजनमधलं पहिलं शतक ठोकलं. गेलने लीगमधलं सहावं तर टी20 क्रिकेटमधलं 21 वं शतक पूर्ण केलं आहे. लीगमधील अनेक रेकॉर्ड गेलच्या नावावर आहे. गेलला सुरुवातीला कोणीच खरेदी केलं नव्हतं. पण शेवटी पंजाबने बेस प्राईस 2 कोटींना गेलला खरेदी केलं. याची खंत देखील गेलने शेवटी बोलून दाखवली.


गेल झाला भावूक


शतक ठोकल्यानंतर गेल खूप भावूक दिसला. लिलावामध्ये त्याच्यावर बोली न लागल्याने त्याने दु:ख बोलून दाखवलं. गेलने म्हटलं की, 'अनेक लोकांना वाटलं की म्हातारा झालो आहे. या खेळीनंतर मला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही. मला सन्‍मान हवा.'