या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता गेल? फोटो होतोय व्हायरल
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : मैदानात उंच आणि मोठे सिक्स मारण्य़ासाठी प्रसिद्ध असलेला वेस्टइंडीजचा खेळाडू अनेकदा आपल्या काही हरकतींमुळे देखील वादात सापडला आहे. ख्रिस गेल नेहमी नाईट पार्टीमध्ये व्यस्त असतो. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पोस्ट केलेला एक फोटो सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बॉलिवूड अभिनेत्री त्याला आवडत असल्याचं त्याने म्हटलं होतं.
'लकी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लालने 2016 मध्ये आयपीएल दरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोसोबत वेस्टइंडीज आणि आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणारा खेळाडू ख्रिस गेल देखील दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत स्नेहाने म्हटलं होतं की, गेलसोबत तिने खूप गप्पा मारल्या आणि डान्स देखील केला. गेल खूप चांगला व्यक्ती आहे. गेलच्या पुढच्या सामन्यासाठी तिने गेलला शुभेच्छा देखील दिल्या.
गेलने देखील म्हटलं की, स्नेहा उल्लाल त्याला आवडते. ख्रिस गेलचा आता विवाह झाला आहे. नताशा असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. गेलला एक मुलगी देखील आहे. स्नेहा ही बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या सारखी दिसते. त्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये सलमान सोबत काम करण्याची संधी देखील मिळाली. सलमान सोबत तिचं नाव देखील जोडलं जात आहे.