मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफ स्पिन गोलंदाज हरभजन सिंह (Harbhajan Singh) दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. भज्जीची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) हीने बाळाला जन्म दिला. टीम इंडियामध्ये 'टर्बोनेटर' म्हणून हरभजन सिंह ओळखला जातो. शनिवारी सोशल मीडियावर हरभजनने याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन आणि गीता यांना एक मुलगी आहे. जिचं नाव "हिनाया' आहे. हिनायाचा 2016 साली जन्म झाला आहे. हरभजनने ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'एका सुदृढ मुलाचा रुपात परमेश्वराने आशिर्वाद दिल्याबद्दल देवाचे आभार. गीता आणि मुलगा दोघंही सुदृढ आहेत.'



हरभजन सिंहने गीता बसरासोबत 29 ऑक्टोबर 2015 साली लग्न केलं. जालंधरमध्ये एकमेकांसोबत या दोघांनी लग्न केलं. हरभजन टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. मैदानावर आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सकरता 2021 च्या सिझनमध्ये पाहिलं होतं.



भज्जी हा भारताच्या टी -२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन संघाचा एक भाग आहे. 2007 मध्ये टीम इंडियाने टी -20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता.


हरभजनने आपला अंतिम स्पर्धात्मक सामना २०१ UA मध्ये युएई विरुद्ध टी -२० सामन्यात खेळला होता. भज्जी आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात केकेआरकडून खेळताना दिसू शकतो. आयपीएल 2021 चे उत्तरार्ध या वर्षी सप्टेंबरमध्ये युएईमध्ये होणार आहेत.