नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू गीता फोगाटचं मत आहे की, नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या वाईट प्रदर्शनाचं कारण अभ्यासाची कमी हे आहे. भारताचा २४ सदस्यीय दल पॅरीसमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकही पदक जिंकू शकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी तक्रार केली की, मुख्य स्थळापासून २५० ते ३०० किमी दूर एका स्थानिक क्लबमध्ये त्यांना सराव करण्यासाठी भाग पाडलं आणि इथे काहीच सुविधा नसल्याचंही ते म्हणाले. गीता म्हणाली की, ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ही जगातली सर्वात कठिण स्पर्धा आहे. या स्पर्धेत पदक मिळवणे फारच कठिण असतं, ऑलम्पिकपेक्षा या स्पर्धेत पदक मिळवणे कठिण आहे. अशात जर कुणी पूर्णपणे तयारी केलेली नसेल तर पदक मिळवणे सोपे नाही’.


ती म्हणाली की, ‘मला विनेश(फोगाट) आणि अन्य कुस्तीपटूंनी सांगितलं की, स्पर्धेत १५ दिवसांआधी पॅरीसला पोहोचल्यावर त्यांनी सरावासाठी कोणत्याच सुविधा पुरवल्या नव्हत्या. इतकेच काय तर आयोजकांनी सरावासाठी दुसरा पहेलवान सुद्धा उपलब्ध करून दिला नाही, कारण दुस-या देशाचा एकही पहेलवान तिथे पोहोचला नाही. मला नाही माहित की या दोष भारतीय कुस्ती महासंघावर लावला जावा की, पॅरीसमधील आयोजकांवर. पण हे दुर्भाग्यपूर्ण आहे की, कुस्तीपटूं स्पर्धेपूर्वी अभ्यास करू शकले नाहीत’.


ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती साक्षी मलिक ही वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमधून सुरूवातीलाच बाहेर झाली. तर विनेश फोगाट सुद्धा लवकरच बाहेर झाला. साक्षीला जर्मनीच्या लुईसा नीमेस्चने मात दिली. तर दोनदा ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेता ठरलेला अमेरिकेच्या विक्टोरिया एंथनीने विनेश फोगाटला मात दिली.