मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाह केला आहे. आधी ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला. ग्लेनची गर्लफ्रेंड तामिळची असल्याने तामिळ पद्धतीनं विवाह सोहळ्याचे विधी सुरू आहेत. आज ग्लेन मॅक्सवेलच्या अंगाला हळद लावली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 मार्च 2022 रोजी या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला. या लग्नसमारंभासाठी काही खास लोकांचीच उपस्थिती होती. मॅक्सवेलनं आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. फोटोमध्ये दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. 


22 मार्चला इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. विनीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. ग्लेननं शेरवानी घातला आहे. हे दोघंही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. 




ग्लेन मॅक्सवेल आणि विनी यांची पहिली भेट मेलबर्न स्टार्स इव्हेंट दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांच्याही भेटीगाठी वाढायला लागल्या. एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तमिळ परंपरेनुसार