नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या बलिदान बॅचवाल्या ग्लब्जप्रकरणी भारतीय क्रिकेट बोर्डाला (BCCI) झटका लागला आहे. आयसीसीने एमएस धोनीला तो ग्लब्ज घालून विकेटकिपींग करण्यास परवानगी नाकारली आहे, ज्यावर बलिदानाची निशाणी आहे. एमएस धोनी आयसीसी वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये हे ग्लब्ज घालून खेळला होता. आयसीसीने यावर प्रश्न उपस्थित केले.  धोनीने अशा निशाणीचे ग्लब्ज घालू नयेत अशी सूचना आयसीसीने दिली होती. यावर भारतीय क्रीडा विश्वातून तिखट प्रतिक्रीया आली आहे. यानंतर बीसीसीआयने यावर अपील केले होते.


काय आहे प्रकरण ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने वर्ल्डकपमधील पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आली. यामॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. या मॅचमध्ये धोनीने  बलिदान मानचिन्ह असलेले ग्लोव्हज वापरले होते. यानंतर आयसीसीने बीसीसीआयला धोनीला हे ग्लोव्हज घालू नये, याबाबत सांगितले होते. धोनीला ते ग्लोव्हज घालता यावे यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती,
सूत्रांनी दिली आहे. ही परवानगी मुंबईत पार पडलेल्या एका बैठकीदरम्यान मागण्यात आली.


नेटकऱ्यांकडून आयसीसी ट्रोल



धोनीने बलिदान मानचिन्ह असलेले ग्लोव्हज घालू नये, असे आयसीसी म्हणाली. त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहे. नेटकऱ्यांनी आयसीसीला ट्विटर द्वारे चांगलेच ट्रोल केले आहे. ट्विटरवर धोनीच्या समर्थन मिळत आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.