मुंबई : टीम इंडियाचे (Team India) दिग्गज खेळाडू हे आता टीम मॅनेजमेंटमध्ये मह्त्त्वाच्या पदावर आहेत. यामध्ये माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष आहे. नुकतंच राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. द्रविडमुळे एनसीए प्रमुख पद रिक्त झालं. त्यामुळे व्ही व्ही एस लक्ष्मणला (Vvs Laxman) द्रविडनंतर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाचे हे 3 माजी दिग्गज भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. (god of cricket sachin tendulkar likely be come in team india new role give hint bcci president sourav ganguly)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक दिग्गज खेळाडू टीम मॅनेजमेंटमध्ये परतणार असल्याचे संकते बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने दिले आहेत. एका कार्यक्रमात त्याने हे संकेत दिले.


गांगुली काय म्हणाला? 


"सचिन इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याला सहभागी होण्याची इच्छा नाही. मात्र मला विश्वास आहे की, सचिनचं टीम इंडियात अशाप्रकारे परत येणं, यापेक्षा निश्चितच कोणतीही चांगली बातमी नसेल", असं गांगुलीने नमूद केलं. तो पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळेस गांगुलीने याबाबतचे संकेत दिले.  


"सचिनला टीम मॅनेजमेंटमध्ये कशाप्रकारे सहभागी करता येईल, हे पाहावं लागेल. कारण अनेकदा हितसंबंधही आड येतात. बरोबर असो किंवा चूक, तुम्ही काहीही करा, कसंही करा, वाद निर्माण होतातच. हे मला फार अवास्तविक वाटतं. त्यामुळे आम्हाला सर्वोत्तम काम करायचं आहे. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांना सहभागी करायला हवं. सचिनला मॅनेजमेंटमध्ये कशाप्रकारे सहभागी करता येईल, याचा मार्ग शोधून काढावा लागेल", असंही गांगुलीने या वेळेस नमूद केलं.   


......तर फॅब फोर एकत्र


दरम्यान सचिनचं मॅनेजमेंटमध्ये आगमन झालं, तर पुन्हा एकदा टीम इंडियाचे फॅब फोर एकत्र दिसतील. सचिन, द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण या चौकडीला क्रिकेटमध्ये फॅब फोर म्हंटलं जातं. त्यामुळे आता काय होतं हे पाहणं औत्सुरक्याचं ठरणार आहे.