नवी दिल्ली : खेळाचा कुंभमेळा समजल्या जाणारे ऑलिम्पिक संपन्न झाले आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics) मध्ये भारतीय खेळाडूंनी (Indian players) उतत्म कामगिरी केली आहे. आज दिल्लीच्या अशोका हॉटेल (Ashoka Hotel) मध्ये संध्याकाळी 6.30 वाजता पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 7 पदकांची कमाई केली आहे. आतापर्यंतची ही भारताची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. भारताने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ६ मेडल जिंकले होते. यंदा भारताच्या खात्यात गोल्ड मेडल ही आला आहे. जैवलिन थ्रो मध्ये भारताच्या नीरज चोपडाने हे सुवर्ण पदक जिंकले. याआधी 2008 मध्ये अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.



आज जेव्हा नीरज चोपडा दिल्ली एअरपोर्टवर पोहोचला तर त्याचं भव्य स्वागत झालं. त्याच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. भारताचा हा पोस्टर बॉय सध्या सर्वांच्याच व्हॉट्सअप आणि फेसबूक स्टेटवर झळकत आहे. त्याची कामगिरी ही संपूर्ण भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यासोबत इतर खेळाडूंचं ही कोतूक होतं आहे.



1. नीरज चोपड़ा – गोल्ड (भालाफेंक)
2. रवी दहिया – सिल्वर (रेसलिंग)
3. मीराबाई चानू – सिल्वर (वेटलिफ्टिंग)
4. पी.व्ही सिंधू – ब्रॉन्ज (बॅडमिंटन)
5. लवलीना बोरगोहेन – ब्रॉन्ज (बॉक्सिंग)
6. बजरंग पूनिया – ब्रॉन्ज (रेसलिंग)
7. पुरुष हॉकी टीम - ब्रॉन्ज