मुंबई : वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेला अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. टीम इंडिया कसून सराव करत आहे. साखळी फेरीतील सामने सुरु होण्याआधी कॅप्टन विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाबद्दल मोठा खुलासा केला आहे. लग्नानंतर फक्त माझा खेळच नाही तर, कॅप्टनशीपमध्ये देखील बदल झाल्याचं त्याने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर आपल्या खांद्यावर अधिक जबाबदारी येते. लग्नांनतर आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात. आपण प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला लागतो. असे कोहली म्हणाला. कोहली आयसीसीच्या संवाद कार्यक्रमात बोलत होता.  


 



मी आधीपेक्षा फार जबाबदार झालो आहे. यामुळे माझ्या कॅप्टनशीपमध्ये बदल झाला आहे. मी एक माणूस आणि खेळाडू म्हणून माझ्यात अनेक बदल झाला आहे.


विरुष्का


प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे ११ डिसेंबर २०१७ रोजी विवाह बंधनात अडकले. यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सिनेसृष्टीत आणि क्रिकेट विश्वात पाहायला मिळाली.  


विराट कोहली यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. आपल्या नेतृत्वात चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी कोहलीवर असणार आहे.


शेन वॉर्न


आयसीसीच्या संवाद या विशेष कार्यक्रमात कोहलीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूपैकी तू कोणत्या खेळाडूची निवड करणार? असा प्रश्न कोहलीला करण्यात आला. यावेळी कोहलीने शेन वॉर्नचे नाव घेतले.


कोहलीचा हा कॅप्टन म्हणून पहिलाच वर्ल्डकप आहे. याआधी कोहली २०११ आणि २०१५ ची वर्ल्डकप स्पर्धा खेळला आहे. २०१५ च्या वर्ल्डकप स्पर्धेत कोहलीकडे टीम इंडीयाचे उपकर्णधार पद होते. परंतु यंदाच्या वर्ल्डकप मध्य टीमची संपूर्ण जबाबदारी ही कोहलीच्या खांद्यांवर असणार आहे.


टीम इंडीया वर्ल्डकप मध्ये आपली पहिली मॅच ५ जूनला खेळणार आहे. ही मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली जाणार आहे.