Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये `अकाय` चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?
अकाय हे नाव युनिक असल्यामुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली. लोकांमध्ये या नावाचा अर्थ नेमका करत काय हे जाणून घेण्याची उत्सुकतता होती.
Google Search 2024 : वर्ष 2024 संपायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. यानिमित्ताने गूगलने त्यांचा सर्च डेटा जगासमोर आणला असून यानुसार वर्षभरात कोणत्या गोष्टी नेटकऱ्यांनी सर्वात जास्त सर्च केल्या याची यादी देण्यात आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव अकाय असं ठेवण्यात आलं. अकाय (Akaay) हे नाव युनिक असल्यामुळे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा झाली. लोकांमध्ये या नावाचा अर्थ नेमका करत काय हे जाणून घेण्याची उत्सुकतता होती. याचमुळे 'अकाय' ने गुगल च्या 'ईयर इन सर्च 2024' लिस्टमध्ये जागा मिळवली.
काय आहे 'अकाय' चा अर्थ?
'अकाय' हा एक हिंदी शब्ध असून याच मूळ तुर्क भाषेतील आहे. संस्कृतमध्ये याचा अर्थ ' शरीर नसलेलं रूप' असं होतो. अकाय हा शब्द 'काया' वरून घेण्यात आलेला आहे. ज्याचा अर्थ शरीर असा असतो. या अनोख्या नावामुळे लोकांना त्याचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आणि गुगलवर 'अकाय' या शब्दाचा शोध विक्रमी पातळीवर पोहोचला.
सर्च ट्रेंडमधून काय समोर आलं?
गुगल ट्रेंडच्यानुसार लोकांनी 'अकाय' शी संबंधित अनेक गोष्टी सर्च केल्या. यात प्रामुख्याने अकाय मीनिंग हिंदी, अकाय मीनिंग इन हिंदी, अकाय इन हिंदी, मीनिंग ऑफ अकाय कोहली या किवर्डसने लोकांनी अकाय या शब्दाचा अर्थ शोधला. गुगल सर्च लिस्ट 2024 मध्ये 'अकाय' ला मिनिंग कॅटेगरीमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर या कॅटेगरीमध्ये 'ऑल आइज ऑन राफा' चा प्रथम क्रमांक आहे. तेव्हा गुगल सर्चच्या टॉप 10 मिनिंग लिस्ट 2024 विषयी जाणून घेऊयात.
ऑल आईज ऑन राफा
अकाय
सर्वायकल कँसर
तवायफ
डेमोरे
पूकी
स्टॅम्पीड
मोये मोये
कान्सक्रेशन
गुड फ्राइडे
2024 मध्ये स्पोर्ट्सशी निगडित टॉप्स सर्च कीवर्ड :
भारतातील नेटकऱ्यांनी 2024 या वर्षात इंडियन प्रीमियर लीग, टी20 वर्ल्ड कप, ऑलिम्पिक 2024, प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगला सर्वात जास्त वेळा गुगलवर सर्च केलं गेलं. तर खेळाडूंमध्ये भारतीयांनी विनेश फोगाट, हार्दिक पांड्या, शशांक सिंह, अभिषेक शर्मा आणि लक्ष्य सेन यांच्या नावांना सर्वात जास्त सर्च केलं.