नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंहने (Yuvraj Singh)त्याच्या जबरदस्त करियरमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. पण नुकताच युवराजच्या नावे आणखी एका रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. युवराज यावर्षी इंटरनेटववर सर्वाधिक सर्च केला जाणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. २०११च्या विश्वचषकात केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर युवराजने जवळपास त्याच्या दोन दशकांच्या कारकिर्दीमधून १० जून रोजी संन्यास घेतला. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याच्या घोषणेनंतर सर्वत्र त्याचीच चर्चा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्च इंजिनद्वारा जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, ३७ वर्षीय युवराज यावर्षी म्हणजेच २०१९ मध्ये सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर खेळाडूंच्या यादीमध्ये युवराज पहिल्या क्रमांकावर आहे.


सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये भारतीय वायूदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पहिल्या क्रमांकावर आहेत. तर गानसंम्राज्ञी लता मंगेशकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 


पाकिस्तानमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या गुगल सर्च लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत.


भारताने २८ वर्षांनंतर आपल्याच देशात २०११चा विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात युवराज सिंहला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आलं होतं. २०११ च्या विश्वचषकानंतर त्याने कर्करोगाविरुद्धही विजय मिळविला. कर्करोगामुळे युवराज बराच काळपासून क्रिकेटपासून दूर होता. युवराज २०१७ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शेवटचं खेळला होता. पण युवराज आयपीएलमध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतो.


हेदेखील वाचाा - पाकिस्तानमध्ये अभिनंदन वर्थमान आणि सारा अली खान Most-searched personalities