IPL 2022 | गुजरात विरुद्ध मुंबई आमनेसामने, कोण जिंकणार?
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. गुजरातने जवळपास प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. तर मुंबई आधीच मोसमातून बाहेर पडलीय. मात्र गुजरातचा हा सामना जिंकून प्लेऑफ प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असेल. तर मुंबई दुसऱ्या विजयाच्या शोधात असणार आहे. (gt vs mi ipl 2022 gujrat titans vs mumbai indians match preview ajrun tendulkar will be debut)
गुजरातने या मोसमात जितके सामने जिंकले आहेत, तितक्याच सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. गुजरात 16 पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर मुंबई 2 पॉइंट्सह शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहे.
अर्जुन तेंडुलकरला संधी?
मुंबईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे आता मुंबई टीममधील युवा आणि नव्या दमाच्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते. यामध्ये अर्जुन तेंडुलकरचं नाव आघाडीवर आहे.
अर्जुनला गेल्या काही दिवसांपासून डेब्यूची संधी मिळणार असल्याची चर्चा होती, मात्र ती चर्चा फक्त चर्चाच ठरली. मात्र अर्जुनला गुजरात विरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन :
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवन, लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी.
मुंबई इंडियंस: ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कीरोन पोलार्ड, ऋतिक शौकीन, डेनियल सैम्स, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय आणि रिले मेरेडिथ.