मुंबई: आयपीएलमध्ये 24 वा सामना राजस्थान विरुद्ध गुजरात सामना होत आहे. पॉईंट टेबलवरच्या पहिल्या स्थानासाठी हा सामना अत्यंत चुरशीचा असणार आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार असून 7.30 वाजता सामना सुरू होईल. पॉईंट टेबलवर राजस्थान टीम पहिल्या स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅथ्यू वेडच्या फॉर्मबाबत मोठी चिंता आहे. त्यामुळे ऋद्धिमान साह आणि मॅथ्यू वेडपैकी कोणाला संधी देणार हे पाहावं लागणार आहे. शमी, राशिद आणि लॉकीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. 


राजस्थानकडे जोस बटलर धडाकेबाज फलंदाज आहे. संजू आणि जोस बटलरची बॅट चालली तर दोघंही अख्खा डाव जिंकवून देऊ शकतात. आजचा सामना फार रंजक असणार आहे. 


गुजरात टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, मॅथ्यू वेड / ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन,  डेविड मिलर, अभिनव मनोहर,  राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी आणि दर्शन नालकंडे


राजस्थान टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन :  देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रॉसी वान डर डुसें, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन