मुंबई : आयपीएल जगातील सर्वात मोठी लीग आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला टीम इंडियाचे दरवाजे खुले होतात. आता टीम इंडियाच्या निवड समितीची चिंता मिटली आहे. याचं कारण म्हणजे बुमराहपेक्षा दोन घातक बॉलर्स टीम इंडियाला मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे माजी कोच रवि शास्त्री यांनी देखील याबाबत मोठी भविष्यवाणी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया 5 टी 20 सामन्यांची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये या दोन स्टार खेळाडूंना संधी मिळू शकते. 


या दोन खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात एन्ट्री


अर्शदीप सिंह 


पंजाब टीमकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंहची कामगिरी यंदाच्या हंगामात खास राहिली आहे. त्याला टीम इंडियात डेब्यू करण्याची संधी मिळू शकते. अर्शदीप 2022 आयपीएलच्या सामन्यात सर्वोत्तम डेथ बॉलर म्हणून ओळखला गेला. 2021 मध्येही त्याची कामगिरी विशेष राहिली आहे. 


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला या खेळाडूला संधी द्यायला नक्कीच आवडेल. डेथ ओव्हर्समध्ये त्याची क्षमता पाहता तो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो. या 23 वर्षीय गोलंदाजाने आयपीएल 2019 मध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये सलग 4 वर्ष उत्तम कामगिरी केल्यानंतर आता टीम इंडियाकडून खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे. 


उमरान मलिक


उमरान हैदराबादकडून खेळणारा घातक बॉलर, त्याच्या बॉलला हिट करणं म्हणजे फलंदाजांनाही एक क्षण घाम फुटतो. सर्वात वेगानं बॉल टाकण्याचा विक्रमही त्याने केला आहे. 


उमरान मलिक सतत 150 च्या स्पीडने बॉल टाकत आहे. गुजरात विरुद्ध खेळताना उमराननं 5 विकेट्स घेतल्या आहेत. 25 धावा देऊन त्याने 5 विकेट्स आपल्या नावे केल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड देण्यात आला. 


टीम इंडियाला बुमराहपेक्षाही घातक गोलंदाजाचा शोध घ्यायचा होता. आता हा शोध उमरानमुळे थांबला असून त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात टीम इंडियातून संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


आयपीएलमध्ये उमराननं 8 सामने खेळून 15 विकेट्स घेतल्या आहेत. युजवेंद्र चहलची पर्पल कॅप धोक्यात आहे. त्यामुळे उमरानच्या कामगिरीवर टीम इंडियाच्या निवड समितीचं बारीक लक्ष आहे. उमरान टीम इंडियातून खेळताना दिसू शकतो. एवढंच नाही तर टी 20 वर्ल्ड कपमध्येही त्याला संधी मिळू शकते.