IPL 2023 Mini Auction : आयपीएलच्या 16  व्या मोसमासाठी (IPL 2023) लगबग आता सुरु झालेली आहे. आता सनरायझर्स हैदराबादने त्यांचा कर्णधार केन विलियम्सनला (Kane Williamson) करारमुक्त केलं आहे. गेल्या वर्षी  SRH टीमने डेविड वॉर्नरला रिलीज केलं होतं. त्यानंत त्यांनी केनला फुल टाईम कर्णधरार बनवलं होतं. गेल्या वर्षी 14 कोटींना रिटेन केलेला विलियम्सन हैदराबादला ट्रॉफी मात्र जिंकून देऊ शकला नाही. मात्र आता हैदराबादनंतर केन आयपीएलच्या कोणत्या टीममध्ये जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आयपीएलमध्ये केनचा परफॉर्मन्सही फार खराब झाला. त्या 13 डावांमध्ये 93.50 च्या स्ट्राइक रेटने केवळ 216 रन्स केले होते. अशातच भविष्यात केन गुजरात टायटंसमध्ये सहभागी होणार का असा प्रश्न कर्णधार हार्दिक पंड्याला विचारण्यात आला. प्रेस कॉन्फरन्समध्ये हार्दिक पांड्याला विचारण्यात आलं की, गुजरात टायटन्स (GT) किंवा इतर कोणतीही फ्रेंचायझी केन विलियम्सनला लिलावात खरेदी करणार का?


या प्रश्नाचं उत्तर देताना हार्दिक पंड्या म्हणाला की, "आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्याला आम्ही टीममध्ये पिक करू. मुळात आयपीएल ही आयपीएल आहे. सध्या तरी मी भारताकडून खेळतोय."


दरम्यान यानंतर हार्दिकला अजून एक प्रश्न विचारण्यात आला. गुजरात टायटंस टीम केन विलियम्सनला विकत घेण्यास उत्सुक आहे का? यावर हार्दिक पंड्या म्हणाला, माहिती नाही... याबाबत विचार करायला अजून भरपूर वेळ आहे. 


गुजरात टायटन्स (Gujarat Titans) 


गतविजेत्या गुजरातने देखील चार खेळाडूंना डच्चू दिलाय. त्यात त्यांनी Jason Roy आणि Varun Aaron ला संघातून वगळंल आहे. त्यामुळे आता संघाकडे 19.25 कोटी रुपये शिल्लक आहे.


सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) 


Kane Williamson आणि Nicholas Pooran यांसारख्या खेळाडूंना संघातून वगळ्यानंतर आता सनरायझर्स हैदराबादकडे  42.25 कोटी असणार असणार आहे. त्यामुळे लिलावात हैदराबादचा जलवा दिसण्याची शक्यता आहे.