Gujarat Titans In IPL 2023 final: मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात फायनलमध्ये; पलटणचा 62 धावांनी दारूण पराभव!
Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 रन्सने पराभव केला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) मुंबईच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याने फक्त 49 चेंडूत शानदार शतक (Shubman Gill Century) झळकावलं.
Gujarat Titans In IPL 2023 final: आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा (GT vs MI) पराभव करून थाटात फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये (IPL 2023 Final) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात भिडत होणार आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 रन्सने पराभव केला आहे. शुभमन गिलच्या (Shubhman Gill) धमाकेदार शतकाच्या जोरावर गुजरातने 20 ओव्हरमध्ये 233 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईला (Mumbai Indians) फक्त 171 धावा करता आल्या.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलने (Shubman Gill) मुंबईच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याने फक्त 49 चेंडूत शानदार शतक (Shubman Gill Century) झळकावलं. वृद्धिमान साहा बाद झाल्यावर मैदानात आलेल्या साई सुदर्शन (Sai Sudharsan) याने शुभमनला मोलाची साथ दिली. एका बाजूने शुभमनची आतिषबाजी सुरू राहिली. तर साई दुसरीकडून हात साफ करत होता. हार्दिकने अखेरच्या काही षटकार आक्रमक फलंदाजी केली आणि टीमचा स्कोर 223 पार केला. मुंबईकडून फक्त आकाश मधवाल आणि पिवूश चावला यांना 1-1 विकेट मिळवता आली. आकाश मधवालने 4 ओव्हरमध्ये 52 धावा दिल्या.
विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं असताना मुंबईचा संघ 171 धावा करू शकला. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि नेहाल वढेरा या दोन्ही सलामीवीरांना चांगला खेळ दाखवता आला नाही. महत्त्वाच्या सामन्यात रोहित पुन्हा फेल ठरला. कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. सूर्याने 38 बॉलमध्ये 61 धावा करत मुंबईच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, मोहित शर्माने (Mohit Sharma) सूर्याला पवेलनयमध्ये धाडलं अन् गुजरातने एकच जल्लोष सुरू केला. त्यानंतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. मोहित शर्माने या सामन्यात 5 विकेट घेतल्या आणि मुंबईला बॅकफूटवर पाठवलं.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वॉलिफार सामन्यात गुजरातचा पराभव केला होता. त्यामुळे आता चेन्नई थेट फायनलमध्ये (IPL 2023 Final) पोहोचली आहे. अशातच आता येत्या 28 तारखेला चेन्नई आणि गुजरात (CSK vs GT) यांच्याच पुन्हा एकदा बिग फाईट पहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा चॅम्पियन कोण? चेन्नई सुपर किंग्ज की गुजरात टायटन्स? असा सवाल आता विचारला जातोय.