Hanuma Vihari On Andra pradesh captaincy : सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) अनेक रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. तर अनेक खेळाडूंनी या हंगामात आपली छाप सोडली आहे. एखादा संघ चांगली कामगिरी करत असताना देखील कॅप्टनने राजीनामा देणं, असा प्रकार फार क्विचित पहायला मिळतो. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये असा प्रकार पहायला मिळाला होता. बंगालविरुद्ध विजयी सलामी देऊन देखील कॅप्टन हनुमा विहारीने कॅप्टन्सीचा (Andra pradesh Ranji captaincy) राजीनामा दिला होता. त्यामुळे क्रिडाविश्वास अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर रिकी भुईची (Ricky bhui) उर्वरित हंगामासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावर आता हनुमा विहारी इन्टाग्राम पोस्ट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय (BCCI) काय निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला Hanuma Vihari?


सध्या मी ही पोस्ट मुद्दामहून लिहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू होत्या. पण नेमकं काय झालं? याबाबत मला तथ्य मांडायचं आहे. आंध्र प्रदेशकडून खेळताना बंगालविरुद्ध पहिल्या सामन्यात मी कॅप्टन होतो, त्या सामन्यात जेव्हा मी 17 व्या एका खेळाडूला ओरडलो आणि त्यानंतर त्या खेळाडूच्या वडिलांनी, जे राजकीय व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच्या वडिलांनी माझ्यावर कारवाई करण्यास असोशिएशनला सांगितलं. आम्ही बंगालविरुद्ध यशस्वी पाठलाग केल्यानंतर देखील मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं, असा खुलासा हनुमा विहारीने केला आहे.



माझी चूक नसताना देखील मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. मात्र, कोणत्याही खेळाडूवर वयक्तीक टीका केली नव्हती. गेल्या 7 वर्षांपासून मी क्रिकेट खेळतोय, आंध्र प्रदेशला 5 वेळा बाद फेरीत नेलंय तर टीम इंडियासाठी 16 कसोटी खेळल्या आहेत. या कालावधीत मी कोणत्याच खेळाडूवर उगाच चिडलेलो नाही, असं मी कधीही करणार नाही, असं हनुमा विहारीने म्हटलं आहे. 



दरम्यान, मला आंध्र प्रदेश संघासोबत खेळण्याची लाज वाटते. मात्र, या हंगामात खेळण्याचं एकमेव कारण म्हणजे मी या संघाचा आदर करतो. मला एका गोष्टीचा खेद वाटतो की, असोशिएशनला असं वाटतं की, सर्व खेळाडूंनी त्यांचं ऐकावं, पण हा संघिक खेळ आहे. मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटतंय. मी माझी खंत आजपर्यंत बोलून दाखवली नाही. मी आता ठरवलंय की, मी आंध्रप्रदेशसाठी खेळणार नाही. मी आता माझा स्वाभिमान गमावला आहे, असं म्हणत हनुमा विहारीने खळबळ उडवली आहे.