नवी दिल्ली :  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर अॅडम वोग्स याने २०१५ मध्ये ३५ व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला आणि  पहिल्याच टेस्टमध्ये त्याने शानदार शतक झळकावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे वोग्स टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक करणारा पहिला वयस्क खेळाडू बनला. त्याने आपल्या टेस्ट करिअरमध्ये असा खेळ केला की त्याने सचिन तेंडुलकर आणि डॉन ब्रॅडमॅनचा विक्रम तोडला. 


वोग्स याचा काल वाढ दिवस होता. त्याचा जन्म ४ ऑक्टोबर १९७९ मध्ये झाला त्याला ३ जून २०१५ मध्ये टेस्ट कॅप मिळाली.


वोग्सने डोमानिकामध्ये वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात नाबाद १३० धावा केल्या. वोग्सने आपल्या छोट्या करिअरमध्ये अशी कामगिरी केली.  त्यामुळे त्याचे नाव आज विक्रमाच्या यादीत आहे. डॉन ब्रॅडमॅननंतर वोग्स हा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे की त्याने १५ टेस्टमध्ये ९५.५० ची सरासरी होती. 


वोग्सने सचिनचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम तोडला...


सचिन तेंडुलकरने २००३-२००४ मध्ये दोनदा आऊट होण्याच्या आत ४९७ धावा केल्या होत्या. डिसेंबर २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध मेलबर्नमध्ये आऊट झाल्यावर सचिनने सिडनीमध्ये पहिल्या डावात नाबाद २४१ धावा केल्या होत्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद ६० धावा केल्या होत्या. त्याने मुल्तानमध्ये पाकिस्तान विरूद्ध खेळताना नाबाद १९४ धावा केल्या. त्यानंतर तो लाहोरमध्ये २ धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याने एकूण ४९७ धावा केल्या  


वोग्सने वेलिंग्टनमध्ये नाबाद १७६ धावांची केली  त्यावेळी त्याने सचिनचा विक्रम तोडला होता. या सामन्यात तो १२३ धावांवर पोहचला तेव्हा त्याने १२ वर्षांपूर्वी सचिनने केलेला ४९७ धावांचा विक्रम तोडला होता. त्याने वेस्ट इंडिज विरूद्ध होबार्टमध्ये नाबाद २६९ धावा केल्या. मेलबर्नमध्ये इंडिज विरूद्ध नाबाद १०६ धावा केल्या. न्यूझीलंड विरूद्ध वेलिंग्टनमध्ये टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ संपत असताना नाबाद १७६ धावा केल्या.  त्यामुळे त्याने एकूण ५५१ धावा केल्या.