Harbhajan Singh : `...क्रिकेट आणि देश सोडण्याची का आली होती वेळ`, हरभजन सिंहने केला `त्या` क्षणाचा खुलासा
Harbhajan Singh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने गोवाफेस्टमध्ये (Goa Feast 2023) क्रिकेट आयुष्यातील काही किस्सा शेअर केला.
harbhajan singh Goa Fest 2023 : आयपीएलने आतापर्यंत अनेक युवा खेळाडू भारतीय क्रिकेट संघटनेला दिले आहेत. गेल्या 15 वर्षात अनेक खेळाडू टीम इंडियाकडून खेळले. अशातच यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) अनेक नवे चेहरे समोर आले आहेत. यावेळी हरभजने भारतीय खेळाडूंसाठी एक सल्ला दिला असून, "भारतीय क्रिकेट संघात राहण्याचे ध्येय ठेवा, जिथे कीर्ती आणि खरा आनंद आहे. पैसा येईल आणि जाईल, पण जर तुम्ही देशासाठी खेळत असाल तर दुसरा आनंद कुठे नाही..." अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने गोवा फेस्टमध्ये दिली.
दक्षिण आशियात प्रसिद्ध पावलेल्य गोवा फेस्ट या महोत्सवात देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात हरभजन सिंग यांना गोवाफेस्टमध्ये अनर्थिंग फ्युचर टॅलेंटमध्ये द राइज ऑफ इंडियन क्रिकेटर्स फ्रॉम ग्रासरूट्स या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मनीष बटाविया यांच्याशी झालेल्या संवादात हरभजने त्याच्या क्रिकेट आयुष्यातील काही किस्से शेअर केला. हरभजन सिंगने भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलींसोबत बाँडबद्दल एक किस्सा शेअर केला. "बर्याच लोकांना माझा स्वभाव माहीत होता, पण गांगुली हा असा होता की ज्याने माझी क्षमता ओळखली आणि माझ्यावर विश्वास ठेवला. यामुळे तो खूप खास कर्णधार बनला माझ्यासाठी...' असा यावेळी म्हणाला...
देश सोडून परदेशात जाण्याचा निर्णय...
सिंग याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितले, "माझ्या आयुष्यातील हा एक वाईट टप्पा होता. जेव्हा मी माझ्या वडिलांना गमावले होते. तेव्हा माझ्याकडे असलेले सर्व पैसेही घर बांधण्यासाठी वापरले. त्यावेळी क्रिकेट सोडून परदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता अन् ठरल होतं की, साफसफाई किंवा घरकामाची नोकरी करणे...", पण काही कालांतराने जेव्हा क्रिकेटच्या संधीने दार ठोठावले, तेव्हा देशातील फिरकी गोलंदाजीचा मास्टर बनला आणि अखेरीस कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज हरभजन सिंह ठरला होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधारही होता.
रिंकू आणि यशस्वी चांगल्या फॉर्ममध्ये
"पण मला वाटते की यशस्वी जयस्वाल हा या वर्षातील सर्वात प्रभावी खेळाडू आहे. तो येत्या काही वर्षात भारतीय क्रिकेट संघाकडून नक्कीच खेळेल. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचे शतक कोणाही विसरु शकत नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने गोवा फेस्टमध्ये दिली.