नवी दिल्ली : क्रिकेटर गौतम गंभीर अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावर लिहीत असतो. त्याच्याच अशाच एका कामामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने आपल्या टि्वटर पेजवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात गौतम गरजू मुलांना जेवण देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी गौतमला सलाम केला. मात्र हा व्हिडीओ पाहून  क्रिकेटर हरभजन सिंग अत्यंत भावुक झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी गौतम गंभीर ने गरजू लोकांच्या मदतीसाठी पाऊल उचलले आहे. गौतम आपल्या संस्थेतर्फे समाजासाठी काहीतरी करू इच्छित आहे. या संस्थेतर्फे रोज लोकांना मोफत जेवं जेवण दिले जाते. 


त्यामुळेच त्याने लहान मुलांना जेवण दिले आणि त्याचा व्हिडीओ देखील शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, "डोळे पाणावले आहेत. या लहान मुलांच्या हाताने आतापर्यंत आपल्या नशिबाला दोष दिला आहे. पण मी प्रयत्न करत आहे. मी यांना जेवण नाही आशा देत आहे."



गंभीरच्या या कामाचे क्रिकेटर हरभजन सिंगने खूप कौतुक केले आहे. त्याने केलेले ट्विट अत्यंत भावुक आहे. तो म्हणतो, "गंभीर तुला खूप सारे प्रेम, ईश्वर तुला खूप आनंदात ठेवो. या कामाबद्दल तुझे धन्यवाद."