T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखला. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताच्या पराभवामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटून हरभजन सिंगनं टीम इंडियाच्या प्लेईंग 11 वर टीका केली आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून दोन खेळाडूंना तात्काळ बाहेर करण्याची मागणी हरभजन सिंगनं केली आहे. हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) मते, सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) यांना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून (Team India Playing 11) काढायला हवं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून रविचंद्रन अश्विन ऐवजी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला (Yujvendra Chahal) संधी दिली पाहिजे. तर ऋषभ पंतने (Rishabh Pant) रोहित शर्मासोबत सलामी करायला हवी. 'स्पोर्ट्स तक'शी बोलताना हरभजन सिंग यांनी सांगितलं की, 'भारतीय संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावा लागेल आणि खेळाडूंपेक्षा संघाचा विचार करावा लागेल. केएल राहुल सध्या फॉर्ममध्ये नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलऐवजी ऋषभ पंतला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायला हवी."


IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मानं स्पष्टच सांगितलं, "आम्ही मैदानात..."


"आर. अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला संधी द्यावी. युझवेंद्र चहल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. सामना जिंकवण्याची कुवत त्याच्यात आहे. टी-20 मध्ये युझवेंद्र चहलपेक्षा चांगला लेग-स्पिनर सध्या तरी मला वाटत नाही.", असंही हरभजन सिंगनं पुढे सांगितलं.


हरभजन सिंगच्या मते अशी असावी टीम इंडिया


भारत- रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनश कार्तिक, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग