मुंबई : टीम इंडियाला (Team India) टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (T 20 World Cup 2022) इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. या पराभवामुळे टीम इंडियावर, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच राहुल द्रविडवर (Rahul dravid) जोरदार टीका करण्यात येत आहे. रोहितच्या टीम इंडियातील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कोच द्रविड आणि कॅप्टन रोहितला हटवण्याची मागणी केली जात आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह (Harbhajan Singh) यानेही प्रतिक्रिया दिली आहे. (harbhajan singh on team india captian rohit sharma and rahul dravid after t 20 world cup 2022 lost against england)


हरभजन काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ज्या खेळाडूने नुकतीच निवृत्ती घेतलीय, अशा व्यक्तीलाच टीम इंडियाचा प्रशिक्षक करण्याची गरज आहे.  मी द्रविडचा सम्मान करतो. मी त्याच्यासोबत खेळलोय. द्रविडच्या जागी आशिष नेहरासारखा व्यक्ती यायला हवा, ज्याने नुकतीच निवृत्ती घेतलीय. जर नेहराला कोच केलं तर तो माझा आवडता कोच असेल", असं हरभजनने नमूद केलं. 


"तसेच कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याला माझी पसंती आहे. त्यापेक्षा सर्वोत्तम पर्याय नाही. पंड्या टीमचा सर्वोत्तम खेळाडू आहे . तसेच टीममध्ये पंड्यासारख्याच अनेक खेळाडूंची गरज आहे", असंही भज्जीने नमूद केलं. 


दरम्यान टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया थेट न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पंड्या टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.