India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हरभजन सिंगनं निवडली Playing XI, या दोन जणांना वगळलं
T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्वांना वेध लागले आहेत ते भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचे. आजी माजी खेळाडूही या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 (India Playing 11) निवडली आहे.
T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्वांना वेध लागले आहेत ते भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचे. सोशल मीडियावर दोन्ही संघाचे चाहते आतापासून एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. असं असताना आता आजी माजी खेळाडूही या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 (India Playing 11) निवडली आहे. या प्लेईंग 11 मधून 3 स्टार खेळाडूंचा पत्ता कापला असून एक बेस्ट कॉम्बिनेशन तयार केलं आहे. सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli), तर चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची निवड केली आहे.
पाचव्या गड्याासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संधी दिली आहे. तर सहाव्या क्रमांकासाठी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संधी दिली असून ऋषभ पंतचा (Rishabh Pant) पत्ता कापला आहे. सातव्या क्रमांकासाठी अष्टपैलू अक्षर पटेलला (Akshar Patel) जागा दिली आहे. संघात एकमेक स्पिनरची निवड केली असून आर. अश्विन (R. Ashwin) ऐवजी युजवेंद्र चहलला (Yujvendra Chahal) मोहोर लावली. कारण फलंदाजीसाठी आर. अश्विनवर संघात तितका विश्वास नाही. दुसरीकडे संघात अक्षर पटेल असताना आर. अश्विन जागा मिळणं कठीण आहे.
Video: Shaheen Afridi च्या गोलंदाजीला चढली धार, यॉर्करवर अफगाणिस्तानचा खेळाडूचा तोडला अंगठा!
भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar), मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि अर्शदीप सिंग (Arshadeep Singh) यांची वेगवान गोलंदाज म्हणून संघात निवड केली आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत गोलंदाजी धुरा मोहम्मद शमीच्या खांद्यावर असणार आहे. हरभजन सिंगनं हर्षल पटेलला या संघात स्थान दिलेलं नाही.