देशभक्तीवर हरभजन सिंगने केलं हटके ट्विट
देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर दोन दिवसांनी क्रिकेटर हरभजन सिंग याने एक ट्विट केलं आहे.
नवी दिल्ली : देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर दोन दिवसांनी क्रिकेटर हरभजन सिंग याने एक ट्विट केलं आहे.
हरभजन सिंग याने १७ ऑगस्ट रोजी हटके ट्विट केलं आहे. हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "अच्छा जाते मी आता झोपायला, पुन्हा २६ जानेवारीला भेटू. आपली देशभक्ती".
हरभजन सिंग याने केलेल्या ट्विटवरुन स्पष्ट होत आहे की त्याला नागरिकांना एक संदेश द्यायचा आहे. कारण, अनेकदा आपण पाहतो की १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला झेंडा खरेदी केला जातो. तसेच देशभक्तीवर आधारीत गाणी ऐकत आपल्यातील देशप्रेम दाखविलं जातं.
तसेच अनेकदा असेही समोर येतं की, १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीनंतर तिरंगा रस्त्यावर किंवा कुंड्यामध्ये पडलेला दिसतो.
दरम्यान, हरभजनने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या हरभजन सिंग हा टीम इंडियात सहभागी नसला तरी तो सोशल मीडियात अॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळत आहे.