मुंबई : हार्दिक पांड्याचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक आक्रामक होत असून तो टीम इंडियातील महत्वाचा खेळाडू ठरत आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांनी पांड्याचे कौतुक केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘हार्दिक हा कपिल देव यांच्यानंतर भारतीय संघाला लाभलेला सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू आहे’, असे ते म्हणाले. 


ते म्हणाले की, ‘हार्दिक पंड्या हा खास क्रिकेटपटू आहे. कपिल देव यांच्यानंतर भारताला जर कोणता ऑलराऊंडर खेळाडू लाभला असेल तर तो हार्दिक आहे’, असे राजपूत यांनी म्हटले आहे.


राजपूत म्हणतात, तो उत्कृष्ट फलंदाज आहेच, शिवाय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो सातत्यपूर्ण कामगिरी करतो. त्याने कसोटीतही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. तो गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणूनही चांगला आहे. कपिल देव यांच्याकडे जी गुणवत्ता होती, ती त्याच्यात आहे. अर्थात, कपिल देव यांच्याएवढी मजल मारण्यासाठी त्याला अजून बराच टप्पा गाठायचा आहे. पण भारतीय संघाला ज्या अष्टपैलू खेळाडूची गरज होती, तो मिळाला आहे.


पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली. त्याने ८३ धावांची खेळी केली आणि गोलंदाजीतही कांगारुंना रोखले. त्यामुळे भारताने चेन्नईतील हा पहिला सामना २६ धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.