Hardik Pandya Viral Photo: गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांच्यात कॅप्टन्सीवरून वाद असल्याचा दावा करण्यात येतोय. आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला. यावेळी रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याकडे कॅप्टन्सी देण्यात आली. या निर्णयावर रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज झालेत. अशातच टीमचा खेळ देखील खराब आहे. यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या एकटा पडला असल्याचं बोललं जातंय. 


हार्दिक पंड्या एकटा पडला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू वानखेडे स्टेडियमवर खेळाडू हात मिळवत असल्याचा हा फोटो असून यावेळी हार्दिक पांड्या डगआउटमध्ये एकटाच बसलेला दिसतोय. त्यामुळे संपूर्ण टीम एकीकडे आणि हार्दिक पंड्या एकीकडे असं चित्र दिसून आलंय यामुळे हार्दिक पंड्या एकटा पडला असल्याच्या चर्चा रंगल्या. 


सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो


या सिझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यापूर्वी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. अहमदाबाद आणि हैदराबादनंतर हार्दिक पांड्याला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अशात राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू स्टेडियममध्ये दिसले, मात्र कर्णधार हार्दिक पंड्या डगआउटमध्ये एकटाच बसून राहिला. यामुळे पुन्हा एकगा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


हार्दिककडून पंड्याचं समर्थन


टीम इंडियाचा माजी स्टार स्पिनर हरभजन सिंगने हा मुद्दा उपस्थित केला. राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या डगआऊटमध्ये एकटाच बसलेला दिसला याविषयी हरभजन म्हणाला, हे चांगले नाही, हार्दिक एकटा पडला आहे. टीममधील हार्दिकचा कर्णधार म्हणून स्वीकार करावा. 


हरभजनने कोणाचंही नाव न घेता रोहित शर्मासह टीमतील वरिष्ठ खेळाडूंवर संताप व्यक्त केला. हरभजनच्या म्हणण्यानुसार, ड्रेसिंग रूममध्ये मोठी व्यक्ती आहेत, जे हार्दिकला मोकळेपणाने काम करू देत नाहीत. संघातील अनेक खेळाडू जाणूनबुजून असो की अजाणतेपणी हार्दिकला गोंधळात टाकतायत. ही परिस्थिती टीमसाठी अजिबात चांगली नाही. 


मुंबई इंडियन्सचा सलग पराभव


राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 125 रन्स केले. यावेळी प्रत्युत्तर राजस्थान रॉयल्सने 15.3 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं. अशा प्रकारे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने सलग तिसरा विजय नोंदवला. दुसरीकडे हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सला तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.