MI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video
Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
Hardik Pandya shouted on jasprit bumrah : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा (Mumbai indians) 24 धावांनी पराभव केला. हातात आलेला सामना मुंबईला जिंकता न आल्याने आता फॅन्स देखील नाराज असल्याचं दिसतंय. मुंबईच्या या पराभवामुळे प्लेऑफमध्ये (MI Playoffs Equations) पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करू शकला नाही. 11 पैकी फक्त 3 सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलाय. त्यामुळे आता हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच आता हार्दिक पांड्या चारही बाजूने प्रेक्षकांच्या नरजेत आला आहे. कोलकाताविरुद्धच्या (MI vs KKR) सामन्यात देखील पांड्याचा संताप पहायला मिळाला.
मुंबई फलंदाजी करत असताना हार्दिक पांड्याला ( jasprit bumrah) चांगली कामगिरी करता आली नाही. पांड्याला केवळ 1 धावा करता आली. तर कॅप्टन्सीमध्ये गोलंदाजांचा योग्य वापर देखील पांड्याला करता आला नाहीये. तर पांड्याला देखील गोलंदाजीत चांगले फटके बसले. पांड्या गोलंदाजी करताना त्याचा वेगळात हावभाव दिसत होता. रोहित मैदानात नसल्याने त्याच्या बॉडी लॅग्वेजमध्ये मोकळेपणा दिसत होता. मात्र, कोलकाताच्या डावाच्या अखेरीस पांड्याचा पारा चढला अन् सर्व संताप फिल्डिंग करत असलेल्या जसप्रीत बुमराहवर काढला. फिल्डिंग करताना बुमराहची चूक नव्हती, असं अनेकांनी म्हटलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या डावाच्या 17 व्या षटकात ही घटना घडली. यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या स्वत: गोलंदाजी करत होता. हार्दिक पांड्याने 30 यार्डच्या वर्तुळात क्षेत्ररक्षण करणाऱ्या जसप्रीत बुमराहला परत जाण्याची सूचना केली. त्यावेळी बुमराहचं लक्ष पांड्याकडे नव्हतं. त्यामुळे पांड्या अचानक बुमराहला ओरडला. पांड्याने जसप्रीत बुमराहला लवकरात लवकर बॉन्ड्रीवर जाण्यास सांगितलं. कॅप्टन ओरडल्यामुळे बुमराह देखील नाराज झाला होता. मात्र, हसून बुमराहने निराशा लपवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा Video
दरम्यान, खेळाडूंवर कडक कारवाई करण्याची मागणी सेहवागने मुंबई संघ व्यवस्थापनाकडे केलीये. 'मला आश्चर्य वाटतं. व्यवस्थापनाने खेळाडूंवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना विचारावं की काय होत आहे किंवा खेळाडूंनी त्यांच्या फलंदाजीचा क्रम का बदलला जातंय? याबद्दल बोललं पाहिजे. कर्णधार, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ दोषी आहेत. मालकांना कठोर प्रश्न विचारण्याची गरज आहे', असं सेहवागने म्हटलं आहे.