मुंबई : भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने साखरपुड्याची घोषणा केली आहे. हार्दिकने सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविकसोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचा फोटो हार्दिकने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 'मै तेरा तू मेरी जाने सारा हिंदूस्तान' असं कॅप्शन हार्दिकने या फोटोला दिलं आहे. यासोबतच हार्दिकने फोटोला अंगठीची इमोजी दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडाच वेळापूर्वी हार्दिकने नताशासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर करुन प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर लगेचच हार्दिकने साखरपुड्याची घोषणा केली. 'माझ्या फटाकडीसोबत नव्या वर्षाची सुरुवात', असं कॅप्शन देत हार्दिकने नताशासोबतचा फोटो शेयर करुन त्याच्या प्रेमाची कबुली दिली. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या या फोटोमध्ये हार्दिक पांड्याने नताशाचा हात धरला आहे. पांड्याने या फोटोसोबत हृदयाचं इमोजी टाकलं.



अनेक दिवसांपासून हार्दिक आणि नताशा एकमेकांना डेट करत आहेत. नताशा हार्दिकसोबत अनेक पार्ट्यांमध्ये आणि त्याच्या घरीही पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपबाबत अनेकवेळा चर्चाही झाल्या आहेत. आता अखेर हार्दिक पांड्याने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.