Indian Dressing Room Video : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आणि श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. सुर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये 10 धावा डिफेन्ड केल्या आणि सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचवला होता. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे श्रीलंकेला 2 धावाच करता आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना कॅप्टन सूर्याने फोर मारला अन् सामना आपल्या खिशात घातला. अशातच आता रोमांचक विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीवर प्रतिक्रिया दिली.


हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा आपण फलंदाजी करत होतो, तेव्हा मोठं आव्हान आपल्यासमोर होतं. परिस्थिती बिकट होती, पहिला काही विकेट्स गेल्यानंतर शुभमन गिल आणि रियान परागने ज्याप्रकारे सामना हाताळला ते खरोखर कौतूकास्पद आहे. त्यांची पार्टनरशीप खूप फायद्याची ठरली. अवघड परिस्थितीत कसं खेळायचं याची जाणीव दोघांना होती. त्यामुळे बॉलर्सला स्कोर डिफेन्ड करायला मदत झाली. जेव्हा वरची फलंदाजी ढासळते, तेव्हा लोवर ऑर्डरवर मोठा भार येतो, मला वाटतं की वॉशिंग्टन सुंदरची फलंदाजी आणि बिश्नोईच्या त्या 8 धावा महत्त्वाच्या ठरल्या, असं हार्दिक पांड्या म्हणाला. त्यानंतर हार्दिकने सूर्याकडे मोर्चा वळवला.


हार्दिक पांड्याने त्यानंतर सूर्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. कॅप्टन म्हणून तू खूप चांगल्या पद्धतीने बॉलरची निवड केली. बॉलर्सची खूप चांगल्या प्रकारे तू हाताळणी केली, स्पेशली जेव्हा डेथ ओव्हरमध्ये कमी धावा डिफेन्ड करायच्या होत्या. बॉलिंग ग्रुपसाठी हे खूप महत्त्वाचं होतं, असं पांड्या सूर्यकुमारला म्हणाला. तसेच त्यावेळी हार्दिकने वॉशिंग्टन सुंदरचं तोंडभरून कौतूक केलं. अशा गेम जिंकता तेव्हा आत्मविश्वास वाढतो, संघ पुढे जातो. सर्वांना शुभेच्छा आणि जे खेळाडू वनडे क्रिकेट खेळणार आहे, त्यांना खुप शुभेच्छा, असं म्हणत हार्दिक पांड्याने खेळाडूंची मनोशक्ती वाढवली.



दरम्यान, सूर्यकुमार यादवला टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी देण्यात आली होती. हार्दिक पांड्याला डच्चू देत सूर्याला कॅप्टन केल्याने क्रिडाविश्वात खळबळ उडाली होती. त्यामुळे हार्दिक पांड्या नाराज असल्याचं देखील दिसलं होतं. अशातच आता पांड्याने सूर्याची स्तुती केल्याने टीम इंडियामध्ये सर्वकाही अलबेल आहे, यावर चाहत्यांचा विश्वास बसला आहे.