Hardik Pandya: हे वागणं बरं नव्हं...; रोहितसमोर दादागिरी करत हार्दिकने केला अंपायरशी उद्धटपणा
SRH vs MI Hardik Pandya: बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH VS MI) यांच्यात सामना रंगला होता. यावेळी या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पंड्याने पुन्हा मैदानावर असंच काहीसं कृत्य केलं. ज्यामुळे लोक त्याला त्याच्या सोशल मीडियावर ट्रोल करतायत.
IPL 2024 SRH vs MI Hardik Pandya: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची टीम मैदानात उरतेय. या सिझनमध्ये मुंबईचे आतापर्यंत 2 सामने झाले असून दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाची चव चाखावी लागली आहे. यानंतर हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. अनेकदा हार्दिक पांड्या मैदानावर किंवा मैदानाबाहेर असं काही कृत्य करतो की, त्याला सोशल मीडियावर क्रिकेट समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं.
बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH VS MI) यांच्यात सामना रंगला होता. यावेळी या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने पुन्हा मैदानावर असंच काहीसं कृत्य केलं. ज्यामुळे लोक त्याला त्याच्या सोशल मीडियावर ट्रोल करतायत.
भर मैदानात अंपायरशी भिडला हार्दिक पंड्या
सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH VS MI) यांच्यातील सामन्याच्या पहिल्या डावात झेराल्ड कोएत्झी गोलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी त्याने पहिल्याच बॉल नो बॉल टाकला. यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने मैदानावर उपस्थित अंपायरकडे निर्णयाचा रिव्ह्यू करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र ज्यावेळी ही घटना टीव्ही किंवा मोबाईल प्रेक्षकांनी पाहिली तेव्हा ते फार वाईट दिसलं. मुख्य म्हणजे हा संपूर्ण प्रकार रोहित शर्मासमोर घडला. त्यामुळे हार्दिक पांड्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसला.
हैदराबादकडून मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) डावाच्या पहिल्या 10 ओव्हर्समध्ये भरपूर रन्स केले. यानंतर उर्वरित 10 ओव्हर्समध्ये टीमचा स्कोर 277 रन्सवर आणला. आणली. फलंदाज हेनरिक क्लासेन आणि एडन मार्कराम यांनी शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये आक्रामक फलंदाजी केली.
हार्दिक पंड्या सतत होतोय ट्रोल
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून, हार्दिक सोशल मीडियावर जवळपास दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होताना दिसतोय. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला मैदानावर रोहित शर्मासोबत केलेल्या वागणुकीमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. तर सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यातनंतर हार्दिक पांड्याला अंपायरशी भांडण केल्याबद्दल ट्रोल करण्यात येतंय.