मुंबई : ३१ मेला लॉर्ड्सच्या मैदानात वेस्ट इंडिज आणि जागतिक-११ या टीममध्ये मॅच होणार आहे. या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. या टीममध्ये भारताकडून ऑल राऊंडर हार्दिक पांड्या आणि विकेट कीपर दिनेश कार्तिक सहभागी होतील. सध्या टी-20 क्रिकेटच्या बॉलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान जागतिक-११ या टीममध्ये आहे. याचबरोबर बांगलादेशचा शाकिब अल हसन, तमीम इकबाल, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि श्रीलंकेचा थिसारा परेरा या टीममध्ये आहेत. या टीमचं नेतृत्व इंग्लंडचा वनडे टीमचा कॅप्टन इओन मॉर्गन करणार आहे.


म्हणून खेळवण्यात येणार मॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एंग्लुईलामधलं जेम्स रोलॅण्ड पार्क आणि डोमिनिसियामधलं विंस्डर पार्क स्टेडियमच्या पुनर्निमाणासाठी ही मॅच खेळवण्यात येणार आहे. मॅचमधून मिळणारा निधी या स्टेडियमच्या पुनर्निमाणासाठी वापरण्यात येणार आहे. ही स्टेडियम इरमा आणि मारिया नावाच्या वादळांमुळे उद्धवस्त झाली होती.


वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा


या मॅचसाठी वेस्ट इंडिजनं १३ सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये क्रिस गेल, आंद्रे रसेल, मार्लोन सॅम्युअल्स या खेळाडूंचा समावेश आहे. पण ड्वॅन ब्राव्हो, सुनील नारायण आणि कायरन पोलार्डला टीममध्ये घेण्यात आलेलं नाही.