PBKG vs GT: अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात तेवतियाच्या (Rahul Tewatia) चौकारामुळे गुजरातने पंजाबचा (PBKG vs GT) पराभव केला आहे. अखेरच्या 6 बॉलवर फक्त 7 धावांची गरज असताना पंजाबने सामना खेचून आणला. सॅम करन आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांच्या दांडग्या बॉलिंगसमोर शुभमन गिलला (Shubman Gill) देखील खेळणं अवघड गेलं. अखेर तेवतियाने फोर खेचला आणि कॅप्टन पांड्याच्या (Hardik Pandya) जीवात जीव आल्याचं पहायला मिळालं. मात्र, या यासामन्यात पांड्याची एक चूक भारी पडली. त्यासाठी त्याला दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने मोहालीच्या मैदानात पराभव केला. या पराभवामुळे पंजाबला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहेत. तर गुजरातने आपली विजयी घोडदौड पुन्हा रुळावर आणलीये. अशातच आता पहिल्या इनिंगवेळी गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या याला स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे.


12 लाखांचा दंड


गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटचा आरोप ठेवण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला या आरोपामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरात टायटन्सची ही पहिली चूक आहे, त्यामुळे कर्णधाराला दंड भरावा लागणार आहे, जर संघाने पुन्हा ही चूक केली तर संबंधित खेळाडूंवर देखील दंड लादण्यात येणार आहे. जर हीच चूक तिसऱ्यांदा झाली तर कॅप्टनवर बॅन देखील लावला जाऊ शकतो.


आणखी वाचा - VIDEO: हार्दिक पांड्याच्या मैदानातील वर्तवणुकीने सर्वांनाच धक्का! व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ


IPL मधील तिसरी घटना


आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis) आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांनाही 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आला होता. त्यानंतर आता गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (hardik pandya) यांच्यावर देखील दंड ठोठावला आलाय. 



प्रेस रिलीज


आयपीएलनेच्या प्रेस रिलीजमध्ये (IPL Press Release) यावर भाष्य केलं आहे. सामना खेळवण्याचा संपूर्ण कालावधी हा 3 तास 20 मिनीट असतो. आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत गुजरात टायटन्सचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा होता, ज्यामध्ये स्लो ओव्हर रेट होता. कर्णधार हार्दिक पंड्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असं आयपीएलच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.