नवी दिल्ली : भारताचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या सध्या संघातून बाहेर आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या ३ टेस्ट मॅचमधल्या सुरूवातीच्या २ मॅचमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 


फिटनेसवर काम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शारीरिक दुखापतीमूळे मी आराम मागितला असल्याचे पांड्याने सांगितले. या वेळेचे उपयोग तो फिटनेस सुधारण्यासाठी करत आहे.


साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला आपल्या क्षमतेचा पूरेपूर वापर करायचा आहे. सध्या तो काही फोटोमूळे चर्चेत आला आहे. 


 सिक्स पॅक



 यावेळी हार्दिकने शर्टलेस फोटोशूट केले आहे. मॅक्सिम मॅग्झिनसाठी त्याने हे फोटोशूट केले आहे.


शर्टलेस होऊन तो आपले सिक्स पॅक दाखवत आहे. हे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.



या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी खूप साऱ्या कमेंट्स केल्या आहेत. 


चाहत्यांनी उडवली खिल्ली 


 या फोटोमध्ये पांड्याने आपले केस रंगविलेले दिसत आहेत. खूप साऱ्या लोकांना पांड्याचा हा लूक आवडला नाही.



त्यामूळे अनेकांनी त्याची सोशल मीडियावर मस्करीही केली आहे. याआधीही अनेकदा स्वीमिंग पूलमधील शर्टलेस फोटो त्याने शेअर केले आहेत.