इंदूर :  भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या वन डे सामन्यात हार्दिक पांड्याने मॅच विनिंग ७८ धावांची खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या सामन्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून स्लेजिंग पाहायला मिळाली. ही घटना  हार्दिक पांड्या आणि पॅट कमिन्स यांच्यात पाहायला मिळाली. पॅट कमिन्सने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला, त्याला  पांड्याने कट करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सरळ फिल्डरच्या हातात गेला. त्यानंतर कमिन्स पुढे येऊन पांड्याला काही तर म्हटले, पांड्याने त्याकडे दुर्लक्ष  केले. 


कमिन्सच्या पुढील चेंडूवर पांड्याने असाच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कमिन्सने असे काही कमेंट पास केल्या. यावेळी पांड्याने आपले कान हातांनी झाकले. आणि कमिन्सकडे इशारा करून बोलत राहा, मी काहीच ऐकत नाही असे सांगितले. 


 



दुसरीकडे कर्णधार विराट कोहली दुसऱ्या एन्डला उभा होता. तो पांड्याकडे आला आणि त्याने खेळावर लक्ष द्यायला सांगितले. या भांडणात पांड्याने कमिन्सला सांगितले की जरा जोरात बोल. 


दरम्यान, पुढच्या चेंडूर पांडया आऊट होता होता वाचला. स्विंग चेंडू त्याच्या पॅडला लागला. एक अपील झाले पण अंपायरने त्याला बाद ठरविले नाही. त्यानंतर पांड्याने लक्षात घेतले की त्याला स्लेजिंगकडे लक्ष द्यायचे नाही तर आपल्या खेळाकडे लक्ष द्यायचे आहे.